मेहकर उपविभागात गांजाच्या बेकायदा लागवडीवर पोलिसांचे मोठे धाडसत्र; १ कोटी ३२ लाखाचा मुद्देमाल जप्त
मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर उपविभागातील पांग्री काटे शिवारात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गांजाच्या बेकायदा लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत दोन संशयितांकडून गांजाची झाडे, फुले व पाने असा एकूण १कोटी३२लाख ९८ हजार ४०० रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत पांग्री काटे शिवारात प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिवारातील गट क्रमांक १४८ व १२८ मधील शेती क्षेत्रात छापा टाकला. तेथे पाणीपुरवठ्याची सोय करून गांजाची लागवड व संगोपन केले जात असल्याचे आढळून आले.
या धाडीत भागवत सदाशिव काटे यांच्याकडून गांजाची झाडे, फुले व पाने असा सुमारे १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत सुमारे ८६ लाख १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच विशाल रमेश काटे यांच्याकडून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे ४५ लाख ८५ हजार ,६००रुपये आहे. एकूण मिळून सुमारे १६४ किलो ९८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, मुद्देमालाची एकत्रित किंमत जवळपास १कोटी ३२ लाख ९८ हजार ४०० रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गणेश कडे यांच्या फिर्यादीवरून अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साखरखेर्डा पोलिसांकडून सुरू असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड पोलीस उपनिरीक्षक गणेश कड पोलीस कर्मचारी डिगांबर चव्हाण सुनील देशमुख उमेश घुगे किशोर बोरे आकाश काळदाते चालक सलीम गवळी सिंदखेडराजा नायब तहसीलदार संदीप बंगाळे ग्राम महसूल अधिकारी आनंद राजपूत कृषी सहाय्यक कोल्हे राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आनंदा शिंदे फॉरेन्सिक मोबाईल पथक बुलढाणा व अमली पदार्थ शोधक शांतता बुलढाणा यांनी केली आहे.
स्थानिक भागात अंमली पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलली जात असून, अशा बेकायदा कृत्यांविरुद्ध नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
मेहकर पोलिसांनी पांगरी काटे छाप्यात १.३२ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला.
मेहकर पोलिसांनी पांगरी काटे येथील अवैध गांजाच्या लागवडीवर छापा टाकून 1.32 कोटी रुपयांचे 165 किलो ड्रग्ज जप्त केले. दोन संशयितांना अटक.
Comments are closed.