ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान लीलावती रुग्णालयात दाखल; वडिलांच्या भेटीसाठी सलमान खानही पोहोचला
बॉलीवूडचे दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९० वर्षीय सलीम खान यांच्या प्रकृतीबाबतची ही बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वडिलांच्या तब्येतीचे वृत्त समजताच अभिनेता सलमान खान तातडीने रुग्णालयात पोहोचला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये सलमानच्या चेहऱ्यावर वडिलांच्या प्रकृतीबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून येत होती. सलमानसोबत त्याची बहीण अलविरा खान देखील वडिलांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित होती.
सलीम खान यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत खान कुटुंबाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ते केवळ नियमित तपासणीसाठी (Routine Checkup) रुग्णालयात गेले आहेत की, त्यांना काही आरोग्याचा त्रास जाणवत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही त्यांच्या वयाचा विचार करता चाहते त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
Comments are closed.