‘लेफ्ट राईट लेफ्ट’ ची कॅप्टन शालिनी कुठे गायब झाली का? 18 वर्षापुर्वी आभिनयाला दिला होता रामराम – Tezzbuzz
अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या प्रोजेक्ट्समुळे प्रंचड ओळख मिळवली, पण नंतर अचानक अभिनयापासून दूर गेले. अशाच एका कलाकाराबाबत बोलत आहोत. राजीव खंडेलवाल अभिनीत “लेफ्ट राईट लेफ्ट” चित्रपटात कॅप्टन शालिनीची भूमिका केली होती. अपर्णा टिळक 18 वर्षांपूर्वी अभिनयातून निवृत्त झाल्या आहेत. परंतु आता त्यांना पुनरागमन करायचे आहे. मात्र अद्याप ती कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. तर अपर्णा आता काय करत आहे ते जाणून घेऊया.
'कोई अपना सा' किंवा चित्रपटू अपर्णा (Aparna)टिळकनी 2003 मध्ये चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. नंतर ती “जीत,” “लेफ्ट राईट लेफ्ट,” “हॅलो फ्रेंड्स,” आणि “फॅमिली नंबर वन” सारख्या शोमध्ये दिसली 2003 मध्ये आलेल्या “फूटपाथ” या चित्रपटात देखील तिने काम केले. या चित्रपटात अपर्णा एका इंग्रजी शिक्षिकेची भूमिका साकारत होती आणि ज्यामध्ये इमरान हाश्मी, आफताब शिवदासानी आणि बिपाशा बसू यांनी अभिनय केला होता.
अपर्णा टिळकने 18 वर्षांपूर्वी अभिनयातून निवृत्त घेतली होती. तर लग्नानंतर तिच्या पतीसोबत दुबईला गेली, मात्र आता चित्रपटात पुनरागमन करायचे आहे.आणि अभिनय क्षेत्रातील तिच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधत आहे, परंतु अद्याप ती कोणत्याही नवीन प्रकल्पात दिसलेली नाही. भविष्यात जर तिला अभिनयाचा प्रकल्प ऑफर झाला तर ती नक्कीच तो स्वीकारेल असे अपर्णा म्हणली आहे.
एका दिलेल्या मुलाखतीत अपर्णा म्हणाली, “मी दुबईला असते, परंतु मी कामासाठी मुंबईला वारंवार प्रवास करत असते. मी मॉडेलिंगसह अनेक लोकप्रिय शो आणि संगीत व्हिडिओ देखील केले आहेत.” पण शोबिझमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर मी दुसरे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून मी दुबईला जाऊन अभिनयाला मागे टाकून नवीन जीवन सुरू करण्याचा विचार केला. अपर्णा टिळक आता टॅरो कार्ड रीडर बनली आहे, लोकांचे भविष्य सांगण्याचे काम करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.