अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय?; रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांग
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवार: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) पहिल्यांदाच एक महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आली आहे. विमानाच्या दोन्ही रेकॉर्डरवर भीषण आगीमुळे उच्च तापमानाचा दुष्परिणाम झाला असला तरी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश आलं आहे. एएआयबीने यायबाबत अधिकृत माहिती दिली. संबंधित विमानात दोन रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरनं नुकसान झालंय. आता कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचा सखोल तांत्रिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरच्या कंपनी प्रतिनिधीची मदत मागितली आहे. तसंच ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधीकडूनदेखील मदत मागण्यात आलीय. त्यामुळे तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवा, असं आवाहन एएआयबी या तपास ब्युरोनं केलंय. या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गृहमंत्री आणि हवाई उड्डाण मंत्री यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आमच्याकडे असणारे पुरावे त्यांना सादर केले आहेत. आम्हाला आशा आहे याचा वापर होईल, असं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)
गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिला नाही- रोहित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)
आम्ही आमच्या पातळीवर तपास केला. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या असल्याचं समोर येत आहे. आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिला नाही, कारण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नव्हते. त्यामुळे त्यांचं काम अमित शाह करत असतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. उद्या आणखी एक पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. बरेच महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत, असंही रोहित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय? (Sunetra Pawar And Parth Pawar On Ajit Pawar Plane Accident)
सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचं अपघातावर काय म्हणणं आहे?, असा प्रश्न रोहित पवारांना एबीपी माझाशी बोलताना विचारण्यात आला. यावेळी अपघात झाल्यानंतर याबाबत पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. आता 13 दिवस झाल्यानंतर ते त्यांचं राजकारण करत आहेत. आम्ही आमचं समाजकारण करत आहोत. अजित पवारांच्या तेराव्या नंतर मी त्यांना भेटलो नाही, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार काय काय म्हणाले?, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.