India France : मुंबईत होणार पंतप्रधान मोदी अन् फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट, ‘Innovation’ साठी केली ही तयारी

मुंबई : गेल्या काही काळापासून भारत आणि फ्रान्सच्या संबंधांची चर्चा देशभर होत आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) सुमारे 3.60 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्री खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये भारतीय वायुदलासाठी 114 राफेल लढाऊ विमाने, नौदलासाठी पी 8आय सागरी विमाने, कॉम्बॅट मिसाईल आणि एअर-शिप बेस्ड हाय अल्टिट्यूड स्यूडो सॅटेलाइटचा (AS-HAPS) समावेश आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. या व्यवहारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच दृढ झाले आहे. अशामध्ये आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत येणार असल्याने शहरात जोरदार तयारी सुरु झाली आहे.







Comments are closed.