एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच! बसस्थानके, डेपो, कार्यशाळांच्या 633 ठिकाणी 7035 सीसीटीव्ही कॅमेरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेसाठी आता संवेदनशील आणि असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. बसस्थानके, आगार, कार्यालये, तसेच विभागीय व मध्यवर्ती कार्यशाळांच्या आवारातील 633 ठिकाणी 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. अनुचित प्रकार रोखण्यासाठी एसटीच्या परिसरातील प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.

संभाव्य दहशतवादी कारवाया तसेच समाजविघातक प्रवृत्तींचा धोका लक्षात घेता एसटी महामंडळाने सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱयांचे जाळे बसवले जाणार आहे. या प्रकल्पावर राज्य सरकारकडून 111 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या ‘टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड’ संस्थेकडे सोपवली आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून वर्षभरात प्रकल्पाला पूर्णपणे मूर्तरूप देण्याचे महामंडळाने निश्चित केले आहे.

मुंबईतील कक्षातून राज्यभर नियंत्रण

सीसीटीव्ही प्रकल्पाचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबईत उभारण्यात आला आहे. या कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसताच तेथे तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.

पायलट टप्प्यात 64 ठिकाणी सीसीटीव्ही

प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरीत्या बसवली आहे. उर्वरित 27 विभाग, विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

MSRTC साठी डिजिटल शिल्ड: संपूर्ण महाराष्ट्रात 633 ठिकाणी 7035 सीसीटीव्ही कॅमेरे

MSRTC वर्धित सुरक्षेसाठी 633 बसस्थानक आणि डेपोवर 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. ₹111 कोटींच्या या प्रकल्पावर मुंबईतील मध्यवर्ती केंद्रातून देखरेख केली जाईल.

Comments are closed.