पाकिस्तानबरोबरच्या वादामुळे भारताला झटका! वर्ल्डकप-चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद धोक्यात

भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय तणाव वाढताना दिसत आहे, याचे अधिक नुकसान क्रिकेट चाहत्यांना होणार आहे. समोर अशी माहिती येत आहे की भविष्यात भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) स्पर्धा इतरत्र हलवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्राने आयसीसी पुरूष संघांच्या २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१चा वनडे विश्वचषक भारताबाहेर हलवले जाईल, असे छापले आहे. या मागचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकमेकाविरोधात सामने न खेळण्याची स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही.

‘द एज’मध्ये छापलेल्या माहितीनुसार, भारताकडून २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१ वनडे विश्वचषक या स्पर्धांचे आयोजकत्व काढले जाईल. जर असे झाले तर ऑस्ट्रेलिया या स्पर्धांमध्ये यजमानपद भुषवेल. ऑस्ट्रेलियामध्ये २०१५चा वनडे विश्वचषक आणि २०२२मध्ये टी२० विश्वचषक खेळला गेला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांनी आयसीसीसोबत एक करार केला आहे, ज्यामध्ये म्हटले गेले की दोन्ही देश विश्वचषकासारखे सामने एकमेंकांच्या देशात खेळणार नाही. त्याचाच परिणाम म्हणून भारताने २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. सद्यस्थिती पाहता २०२७ पर्यंत या करारनुसार भविष्यातही असेच केले जाईल.

सध्या भारत आणि श्रीलंकेत आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. याच करारामुळे पाकिस्तानचे सर्व साखळी सामने श्रीलंकेच खेळण्याचे आयोजित केले आहे. नुकतेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. तेव्हा मैदानाबाहेरचे वातावरण चांगलेच तापलेले दिसले. हा सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. ज्यामध्ये पाकिस्तान १७६ धावसंख्येचा पाठलाग करताना ११४ धावांवरच सर्वबाद झाला.

या स्पर्धेत ग्रुप ए मध्ये असलेले भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीमध्ये समोरा-समोर आले तर ते सामनेही श्रीलंकेतच खेळले जाणार आहेत. सध्या भारत या स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तानची जाग मात्र अद्यापही निश्चित झालेली नाही. भारताने सलग तीन सामने जिंकत सुपर-८ची फेरी गाठली, तर पाकिस्तानने ३ पैकी २ सामने जिंकले आहे.

Comments are closed.