मुंडवा जमीन प्रकरणाचा अहवाल कालच मिळाला, पण अजून पाहिलेला नाही – चंद्रशेखर बावनकुळे
पुण्यातील मुंडवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या खारगे समितीने मंगळवारीच त्यांचा अहवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र अद्याप बावनकुळे यांनी हा अहवाल वाचला नसल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अहवालाचा लिफाफा अद्याप पाकिटबंदच असल्याचे त्यांनी सांगितल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
Comments are closed.