T-20WC2026: यजमान श्रीलंकेला मोठा झटका! सुपर-8 मध्ये पोहोचताच ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर

भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) यांच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये श्रीलंका संघाने दमदार कामगिरी करत ‘सुपर-8’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, या महत्त्वाच्या टप्प्यापूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana out of the tournament) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
16 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना पथिरानाच्या पायाच्या स्नायूंना ताण आला. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. वैद्यकीय तपासणीनंतर (स्कॅन रिपोर्ट) आता हे स्पष्ट झाले आहे की, पथिराना यापुढे वर्ल्ड कपमधील एकही सामना खेळू शकणार नाही. श्रीलंकेसाठी हा दुसरा धक्का आहे, कारण याआधीच त्यांचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा (Waninadu hasranga) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.
श्रीलंकेचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना 19 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. सुपर-8 फेरीतील श्रीलंकेचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्ध पल्लेकेले स्टेडियमवर होईल. पथिरानाच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीलंकेचे फलंदाजी सल्लागार विक्रम राठोड यांनी सांगितले की, बदली खेळाडूबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
Comments are closed.