ICC T-20 World Cup – आता खरा धुरळा उडणार! सुपर-8 चं शेड्युल जाहीर, जाणून घ्या टीम इंडियाच्या लढती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ICC T20 World Cup 2026 मध्ये आता तिखट सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. साखळी फेरीतील चुरस आता संपुष्टात येईल आणि सुपर 8 ची धुमश्चक्री 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

सुपर 8 चे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियाला या वर्ल्ड कपमध्ये तगडा झटका बसला असून संघ थेट वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेला. ऑस्ट्रेलियाच्या जागी झिम्बाब्वेने सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे आठ संघ सुपर 8 मध्ये एकमेकांना भिडणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत सुपर 8 चा थरार रंगणार आहे.

सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये चेन्नईमध्ये भिडत होईल. सुपर 8 मधील टीम इंडियाचा तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध 1 मार्च रोजी कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर 4 मार्चपासून सेमी फायनलचं द्वंद्व सुरू होईल.

Comments are closed.