Ratnagiri News – पोलीस भरतीच्या चालकपदासाठी ५१० उमेदवार हजर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीच्या पाचव्या दिवशी चालक शिपाई पदाच्या भरतीसाठी 800 पुरुष आणि 8 महिला अशा एकूण 808 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यातील 507 पुरुष आणि 3 महिला असे एकूण 510 उमेदवार भरतीसाठी हजर होते. त्यातील 23 उमेदवार अपात्र ठरल्यामुळे पात्र ठरलेल्या 487 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. तर 298 उमेदवार या पोलिस भरतीसाठी गैरहजर राहिले होते.

शिपाई आणि चालक शिपाईच्या 108 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे. चालक शिपाई पदाची भरती प्रक्रिया करण्यात आली. सकाळी 5.30 वा.पासून मिरजोळे एमआयडीसी येथील क्रिडा संकुलात या भरती प्रक्रियेला सुरुवात होते. यावेळी प्रथम मैदानी चाचणी घेण्यात येत असून पाचव्या दिवशी बुधवारी 808 उमेदवारांना बोलावण्यात आले होते.

त्यापैकी केवळ 510 उमेदवारच भरतीच्या ठिकाणी हजर होते. त्यातील 23 उमेदवार पोलिस भरतीच्या नियमात बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित 487 उमेदवारांची उमेदवारांपैकी पुरुष उमेदवारांची 1600 मिटर धावणे, महिला उमेदवारांची 800 मिटर धावणे आणि गोळा फेक या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या.

Comments are closed.