T-20WC2026: सुपर-8 पूर्वी दुखापतीमुळे मथीशा पथिराना विश्वचषक स्पर्धेबाहेर, तर या खेळाडूची संघात एन्ट्री

ऑस्ट्रेलियाला हरवून सुपर-8 मध्ये जागा मिळवणाऱ्या श्रीलंकेच्या संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी दिलशान मदुशंकाला (Dilshaan madushanka) संघात स्थान मिळाले आहे.
16 फेब्रुवारीला कॅन्डी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पथिरानाच्या डाव्या पायाच्या स्नायूंना ताण आला. त्याला त्याचे षटकही पूर्ण करता आले नाही आणि फिजिओच्या मदतीने तो मैदाबाहेर गेला. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का आहे, कारण त्यांचा स्टार ऑलराउंडर वानिंदू हसरंगा आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने दिलशान मदुशंकाला पथिरानाचा बदली खेळाडू म्हणून अधिकृत मंजुरी दिली आहे.
मदुशंका स्वतः दुखापतीशी झुंज देत होता. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2025 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. 2013 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याने 21 विकेट्स घेत श्रीलंकेसाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. टी-20 मध्ये त्याने 15 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या आहेत.
अलीकडेच ओमानविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने 3 षटके टाकली होती, पण त्याला विकेट मिळाली नव्हती. श्रीलंका आपला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना गुरुवारी (19 फेब्रुवारी) कोलंबो येथे झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे.
Comments are closed.