ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील ‘काळा’ रेकॉर

अभिषेक शर्माची आकडेवारी T20 विश्वचषक 2026 : भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या नावावर एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या पहिल्याच तीन डावांमध्ये शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतला. यापूर्वी यूएसए आणि पाकिस्तानविरुद्धही त्याला धावफलक एक पण धाव लावता आली नव्हती.

अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील ‘काळा’ रेकॉर्ड

टी-20 विश्वचषकातील कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत 0 वर बाद होण्याची नकोशी हॅट्ट्रिक अभिषेकने केली आहे. त्याच्याआधी हा विक्रम आशीष नेहराच्या नावावर होता. नेहरा आपल्या टी-20 विश्वचषक कारकिर्दीतील पहिल्या दोन डावांत शून्यावर बाद झाला होता आणि त्याला स्पर्धेत एकही धाव करता आली नव्हती. मात्र अभिषेकने हा नकोसा विक्रम आणखी पुढे नेत तीन सलग शून्यांची नोंद केली आहे.

पुन्हा खाते उघडण्यापूर्वीच माघारी…

अभिषेकसाठी हा पहिलाच टी-20 विश्वचषक आहे, पण सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. यूएसएविरुद्ध तो गोल्डन डकचा बळी ठरला. पाकिस्तानविरुद्ध चार चेंडू खेळूनही त्याला धाव करता आली नाही. आता नेदरलँड्सविरुद्ध तिसऱ्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला आणि त्याच्या नावावर शून्यांची हॅट्ट्रिक जमा झाली.

ही खराब मालिका फक्त विश्वचषकापुरती मर्यादित नाही. मागील सहा टी-20 डावांत अभिषेक चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. या सहा डावांत त्याने केवळ एका अर्धशतकासह एकूण 98 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आता त्याच्याकडून दमदार पुनरागमनाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 Super 8 Schedule : 9 दिवसांत, 12 सामने… टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान संघांचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही

आणखी वाचा

Comments are closed.