पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!

T20 WC 2026 इंड विरुद्ध नेड अभिषेक शर्मा: भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) नावावर एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या पहिल्याच तीन डावांमध्ये शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतला. यापूर्वी यूएसए आणि पाकिस्तानविरुद्धही त्याला धावफलक एक पण धाव लावता आली नव्हती.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 WC 2026) अद्याप एकही धावा अभिषेक शर्माने केली नाही. नेदरलँड्सविरुद्ध अभिषेक शर्मा मोठी खेळी करेल, अशी सगळ्यांना आशा होती. परंतू नेदरलँडविरुद्धही अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. नेदरलँड्सविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इशान किशन आणि अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. त्याआधी अभिषेक शर्माने त्याच्या जर्सीवरुन सगळ्यांचे लक्ष वेधले होते. अभिषेक शर्मा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची जर्सी घालून मैदानात उतरला होता. पण अभिषेक शर्माने जर्सी का बदलली, याची सध्या चर्चा रंगली आहे. (Abhishek Sharma Wearing Mohammed Siraj Jersey)

अभिषक शर्माने मोहम्मद सिराजची जर्सी का घातली होती? (Abhishek Sharma Jersey)

अभिषेक मैदानात येताच तो मोहम्मद सिराजची जर्सी घातलेला दिसला. मात्र मोहम्मद सिराजची जर्सी घाल्याआधी त्याने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची जर्सी परिधान केली होती. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु अभिषेक शर्माने स्वत:च्या नावाची जर्सी का घातली नव्हती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता यामागील कारणही समोर आलं आहे. हॉटेलमध्ये त्याची जर्सी विसरल्याने अभिषेक शर्मा मोहम्मद सिराजची जर्सी घालून मैदानात उतरल्याची माहिती भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी समालोचन करताना दिली.

अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम- (Abhishek Sharma T20 World Cup 2026)

इशान किशनने विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष अभिषेक शर्माकडे होते. नेदरलँड्सकडून पहिल्याच षटकात फिरकीपटू आर्यन दत्त गोलंदाजीसाठी आला. यावेळी पहिले दोन चेंडूंवर अभिषेक शर्माला धाव घेता आली नाही. त्यानंतर पुढील चेंडूत अभिषेक शर्माला बाद करण्यात आर्यन दत्तला यश आले. अभिषेक शर्माला 3 चेंडूत एकही धाव करता आली नाही. टी-20 विश्वचषकातील कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत 0 वर बाद होण्याची नकोशी हॅट्ट्रिक अभिषेकने केली आहे. त्याच्याआधी हा विक्रम आशीष नेहराच्या नावावर होता. नेहरा आपल्या टी-20 विश्वचषक कारकिर्दीतील पहिल्या दोन डावांत शून्यावर बाद झाला होता आणि त्याला स्पर्धेत एकही धाव करता आली नव्हती. मात्र अभिषेकने हा नकोसा विक्रम आणखी पुढे नेत तीन सलग शून्यांची नोंद केली आहे.

संबंधित बातमी:

T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.