चंद्रपूरमध्ये बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
बसच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकातील सिग्नल वर घडली. बस चंद्रपूरवरून घुग्गूस कडे जात असताना अचानक सायकल स्वाराचा तोल गेल्याने तो बस खाली आला आणि जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मृत सायकलस्वाराचा नाव अद्याप कळू शकले नाही. रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा या घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसा पासून जनता कॉलेज चौकातील सिग्नल परिसरात अनेक अपघात होत आहेत. वाहतूक पोलिसासह प्रशासनं दुर्लक्ष करीत आहेत.
Comments are closed.