विश्वचषकात बांगलादेशचा धमाकेदार कमबॅक! ऑस्ट्रेलियाचीही एन्ट्री… ICC ची अधिकृत घोषणा, अंतिम यादी
T20 विश्वचषक 2028 12 संघ पात्रता आयसीसीने जाहीर केली: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा सध्या सुपर-8 टप्प्याकडे वाटचाल करत असतानाच, 2028 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकाबाबत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने 2028 च्या स्पर्धेसाठी तब्बल 12 संघांची नावे जवळपास निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे.
यजमानपदाचा थेट फायदा
2028 च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्याशिवाय 2026 च्या टी-20 विश्वचषकात सुपर-8 फेरीत पोहोचलेल्या संघांनाही आपोआप पात्रता मिळणार आहे.
12 संघांनी आयसीसी पुरुषांसाठी तिकीट निश्चित केले आहे #T20WorldCup 2028 🎫
अधिक ➡️ https://t.co/PeTqvtPWt0 pic.twitter.com/QTVapKCH9S
— ICC (@ICC) 19 फेब्रुवारी 2026
भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर 2028 च्या विश्वचषकाचे तिकीट जवळपास पक्के केले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 9 संघांनी 2026 मधील कामगिरीच्या आधारे 2028 साठी आपली जागा निश्चित केली आहे.
उर्वरित तीन जागांसाठी रँकिंगमध्ये चुरस
आता उरलेल्या तीन जागांसाठी आयसीसी टी-20 रँकिंग निर्णायक ठरणार आहे. पात्रतेसाठी 9 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या क्रमवारीनुसार बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड हे संघ आघाडीवर आहेत. जर रँकिंगमध्ये मोठा बदल झाला नाही, तर या तिन्ही संघांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, अधिकृत घोषणा 9 मार्च रोजीच केली जाणार आहे.
बांगलादेशच्या पुनरागमनाची शक्यता
वादग्रस्त कारणांमुळे 2026 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर राहिलेल्या बांग्लादेश संघासाठी 2028 मध्ये पुनरागमनाची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, 2026 मध्ये संधी मिळालेल्या स्कॉटलंड संघाला यावेळी प्रादेशिक पात्रता फेरीतून मार्ग काढावा लागू शकतो.
पुढील समीकरणांकडे सर्वांचे लक्ष
सुपर-8 फेरीतून बाहेर पडले असले तरी यजमानपदाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 2028 साठी थेट प्रवेश मिळाला आहे. आता 2028 च्या टी-20 विश्वचषकात कोणते संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारतील, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विश्वचषक 2028 चा रंगतदार प्रवास आता हळूहळू आकार घेत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.