धक्कादायक! विवाह सोहळ्यातच दोन गटात जोरदार वाद, तीन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, धुळे हादरलं

धुळे क्राईम न्यूज : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात विवाह समारंभावेळी दोन गटात जोरदार वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या वादात धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. या घटनेत सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून, साई गोसावी यांचा धुळ्यात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पिंपळनेर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

Crime News: गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं डोळे, हात-पाय बांधले; चाकू तुटेपर्यंत शरीरावर वार, तिला संपवल्यावर मृतदेहाजवळ बसून प्यायला दारू अन्…

आणखी वाचा

Comments are closed.