'अशाच' चाचण्या यशस्वी झाल्या
नवी दिल्ली : भारताच्या महत्वाकांक्षी ‘गगनयान’ अभियानासंदर्भात एक महत्वाचे परीक्षण यशस्वीरित्या करण्यात आले आहे, अशी माहिती भारताची जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दिली आहे. ‘ड्रोग पॅरॅशूट क्वालिफिकेशन’ असे या परीक्षणाचे नाव आहे. पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगढ येथील टर्मिनल बॅलेस्टिक रेंज प्रयोगशाळेत हे परीक्षण बुधवारी करण्यात आले. हे परीक्षण ‘संरक्षण आणि संशोधन संस्थे’कडून (डीआरडीओ) करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली. डीआरडीओच्या या परीक्षण प्रयोगशाळेला ‘रेल ट्रॅक रॉकेट स्लेड’ अशी संज्ञा आहे. ही या संस्थेची एक विषेश प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत उच्च वेग एअरोडायनॅमिक्स आणि बॅलेस्टिक परीक्षणे केली जातात. ही परीक्षणे गगनयान अभियानाकरीता अत्यंत महत्वाची आहेत. तसेच अवकाश संशोधनातील पुढची आव्हाने स्वीकारण्यासाठीही या परीक्षणांचे अत्याधिक महत्वा आहे. अशी आणखी परीक्षणे केली जाणार आहेत, असे प्रतिपादन इस्रोकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.