टीम इंडिया नव्हे ग्रुप 1 मधून हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार; मोहम्मद आमीरने सांगितलं चक्रा
मोहम्मद अमीरने T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील संघाची भविष्यवाणी केली: 21 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीला सुरुवात होत आहेत, तर हे सामने 1 मार्चपर्यंत रंगणार आहेत. सेमीफायनलचे सामने 4 आणि 5 मार्चला खेळवले जातील, तर अंतिम सामना 8 मार्च रोजी होणार आहे. भारतीय संघ 1 गटात असून त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. तर 2 गटात पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे.
सुपर-8 फेरीत भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, दुसरा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आणि तिसरा सामना 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा पहिला सामना 21 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध, दुसरा 24 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध आणि अखेरचा सामना 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या फेरीपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे.
मोहम्मद आमीरची धक्कादायक भविष्यवाणी
लीग टप्प्यातील दमदार कामगिरीमुळे टीम इंडिया या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य दावेदार मानली जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने प्रभावी खेळ दाखवला आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद आमीरने एका कार्यक्रमादरम्यान मोठे वक्तव्य केले. त्याच्या मते, भारत सुपर-8 फेरीतून सेमीफायनलमध्ये पोहोचू शकणार नाही.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) याने एका शोमध्ये बोलताना म्हटले की, आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत (Semifinals) भारत पोहोचू शकणार नाही. त्याने भारताऐवजी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील, असा दावा केला आहे.
मोहम्मद आमीर म्हणाला की, भारत फक्त पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगला खेळला, बाकी सर्व सामन्यांत त्यांची फलंदाजी ढेपाळली आहे. सुपर-8 मध्ये दबाव वाढेल आणि ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळत आहेत, ते भारताला बाहेर करू शकतात.”
आमिरचे भाकीत भारत WC सेमीमध्ये जाणार नाही.
मोहम्मद अमीर म्हणाला की, भारत वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी पात्र होणार नाही.
– आधी स्लॉगर अभिषेक शर्मा होता, आता भारत आहे. हे खरोखर भारतासाठी केले आहे. pic.twitter.com/MqyZ3Tgwil
– सलमान. (@TsMeSalman) 19 फेब्रुवारी 2026
यापूर्वीही भारतीय खेळाडूंवर टीका
आमिरने याआधीही भारतीय क्रिकेटपटूंवर टीका केली आहे. विशेषतः टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अभिषेक शर्माला त्याने लबाड फलंदाज असे संबोधले होते. मात्र सध्या अभिषेक शर्मा खराब फॉर्मशी झुंज देत असून तो आतापर्यंतच्या तीन डावांत खातेही उघडलेले नाही. आता सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेक शर्मा दमदार खेळी करत आमिरला मैदानावरूनच उत्तर देईल आणि टीम इंडियाला सेमीफायनलकडे नेतील, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.