नारायण चौधरीच भिवंडी महापौरपदी विराजमान, भाजपला मोठा धक्का
भिवंडी महापौर निवडणूक 2026: दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज भिवंडी महानगरपालिकात महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत (Bhiwandi Mayor Election 2026) भाजपचे बंडखोर नारायण चौधरी (Narayan Chaudhari) विजयी झाले. स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या प्रक्रियेनंतर हात वर करून मतदान घेण्यात आले आणि चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला.
महापौरपदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यापैकी एक अर्ज ग्राह्य धरला. माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलीस एस्कॉर्टने येत असल्याने वेळ वाढवण्याची मागणी झाली; मात्र प्रक्रिया थांबवण्यास नकार देण्यात आला.
अखेरीस 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, ज्यामध्ये कोणार्कचे मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील, शिंदेसेनेचे बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे, काँग्रेसचे तारिक मोमीन, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांचा समावेश होता. त्यामुळे अंतिम लढत त्रिकोणी झाली. नारायण चौधरी (काँग्रेस-राष्ट्रवादी सेक्युलर फ्रंट समर्थित), विलास पाटील (शिवसेना – शिंदे गट), स्नेहा पाटील (भारतीय जनता पार्टी) यांच्यात लढत झाली.
Bhiwandi Mayor Election 2026: ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली
नारायण चौधरी हे मूळचे भाजपचे बंडखोर नेते आहेत. सुरुवातीला त्यांचे नाव भाजपकडून चर्चेत होते; मात्र ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांनाच महापौरपदाचा अधिकृत उमेदवार घोषित करत व्हीप जारी केला.
दुसरीकडे भाजपने स्नेहा पाटील यांच्यासाठी, तर शिंदे गटाने विलास पाटील यांच्यासाठी पक्षादेश जारी केला. विलास पाटील न्यायालयीन कोठडीत असल्याने सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला, तरीही मतदान प्रक्रिया नियोजित वेळेनुसार पार पडली.
Bhiwandi Mayor Election 2026: मतदान आणि निकाल
सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले.
नारायण चौधरी – 48 मते
विलास पाटील – 25 मते
स्नेहा पाटील – 16 मते
सेक्युलर फ्रंटच्या एकजुटीमुळे चौधरी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांच्या नावाची घोषणा होताच सभागृहात जल्लोष झाला.
Bhiwandi Mayor Election 2026: भाजपला मोठा राजकीय धक्का
महायुतीकडे आकडे असल्याचे चित्र असतानाही ऐनवेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचा पराभव झाला. पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि सेक्युलर फ्रंटची रणनीती यामुळे भिवंडीच्या सत्तासमीकरणात मोठा उलटफेर झाला आहे. भिवंडी महापालिकेतील ही निवडणूक केवळ महापौरपदापुरती मर्यादित न राहता, आगामी स्थानिक राजकारणासाठीही दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Bhiwandi Mayor Election 2026: उमेदवारांना मिळालेली एकूण मते
नारायण चौधरी
काँग्रेस – 30
राष्ट्रवादी S.P – 12
भाजप – 6
विलास पाटील
कोणार्क विकास आघाडी – 4
शिवसेना – 12
समाजवादी – 6
भिवंडी विकास आघाडी – 3
स्नेहा पाटील
भाजप – 16
एक अपक्ष गैरहजर
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.