Share Market Update – मार्केटचे घुमजाव; घसरणीनंतर पुन्हा तेजी, सेन्सेक्स 450, तर निफ्टी 125 अंकांनी वधारला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली.शुक्रवारी मुंबई मार्केटची सुरूवात धिम्या गतीने झाली होती. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सुमारे 291 अंकांनी घसरून 82,206 वर पोहोचला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी  सुमारे 74 अकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र ही घसरण फार काळ टिकली नाही.

शुक्रवारी सकाळी कोसळलेल्या शेअर बाजाराने काही वेळातच पुन्हा मुसंडी मारली. सकाळी 10.44 वाजेपर्यंत सेन्सेक्स 421.04 अंकांच्या वाढीसह 82,919.18 वर पोहोचला. सेन्सेक्ससह निफ्टीनेही उसळी मारली असून तो 145.10 अंकांची वाढ होऊन 25,599 पर्यंत पोहोचला आहे. या रिकव्हरीमुळे सुरूवातीला नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

बॅंकिंग आणि कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये जोरदार खरेदी झाल्याने बाजारात तेजी आली. अवघ्या काही वेळातच दोन्ही निर्देशांकांनी आपली गमावलेली घसरण भरून काढली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.

सेन्सेक्समधील दिग्गज 30 कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या नफ्यात होत्या. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL- 443.05), NTPC (367.25), लार्सन अँड टुब्रो (4329.35) आणि टायटन (4232.90) यांसारख्या शेअर्सनी बाजाराला साथ दिली. बँकिंग क्षेत्रात ॲक्सिस बँक (1361.35) आणि आयसीआयसीआय बँकेत (1397.00) खरेदी दिसून आली. मात्र, दुसरीकडे आयटी क्षेत्रातील टेक महिंद्रा आणि इन्फोसिस यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने या क्षेत्रावर काहीसा दबाव जाणवला.

Comments are closed.