कर्णधार हरमणप्रीत कौरचा विश्वविक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू
विश्वविजेत्या हिंदुस्थानच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा धमाका केला आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. गुरुवारी (19 फेब्रुवारी 2026) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात मैदानात उतरतात हरमनप्रीत कौरने विश्वविक्रमाला गवसणी घातली.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामना टीम इंडियाने जिंकला तर गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असली तरी, कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. हा हरमनप्रीत कौरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला 356 वा ठरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 326 सामने खेळणारी हरमनप्रीत जगातील पहिला महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर होता. तिने 355 सामन्यांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या महिलांमध्ये आता हरमनप्रीत कौर पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर सुझी बेट्सचा समावेश आहे. या क्रमवारीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची ऐलिस पेरी (349 सामने), चौथ्या क्रमांकावर हिंदुस्थानची मिताली राज (333) आणि पाचव्या क्रमांकावर इंग्लंडची चार्लोट एड्वर्डस (309) या खेळाडूंचा समावेश आहे. हरमनप्रीतने 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत तिने सहा कसोटी सामने, 161 वनडे आणि 189 टी20 सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
Comments are closed.