खराब फॉर्ममध्ये असूनही बाबर आझम इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! या दिग्गज खेळाडूचा विश्वविक्रम मोडीत निघणार

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम (Babar Azam) सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) च्या संघात तो असला तरी, अद्याप त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. नामीबियाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र, 21 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ‘सुपर-8’ च्या पहिल्या सामन्यात बाबरकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनण्याचा मान बाबरला मिळू शकतो. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता केवळ 20 धावांची गरज आहे. सध्या हा जागतिक विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 343 डावांत ही कामगिरी केली होती. विराट कोहलीने 360 डावांत हा टप्पा गाठला होता. जर बाबरने पुढच्या सामन्यात 20 धावा केल्या, तर तो केवळ 335 डावांत हा विक्रम आपल्या नावावर करेल आणि शोएब मलिकनंतर 12,000 टी-20 धावा करणारा तो पाकिस्तानचा दुसरा खेळाडू ठरेल.

केवळ 12,000 धावाच नव्हे, तर टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही बाबर मोडू शकतो. यासाठी त्याला 32 धावांची गरज आहे. सध्या शोएब मलिक 31 डावांत 643 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर बाबरच्या नावे 20 डावांत 615 धावा आहेत. चालू विश्वचषकात बाबरने 3 डावांत केवळ 66 धावा केल्या असल्या, तरी न्यूझीलंडविरुद्धचा त्याचा जुना रेकॉर्ड पाहता क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Comments are closed.