सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक २०२६ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १४० खेळाडू सहभागी

सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक २०२६ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत शहरातून १४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे २१ ते २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार आहे.
सोमेश्वर चषक २०२६ बॅडमिंटन स्पर्धा ९, ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींच्या गटात, तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी एकेरी व दुहेरी गटात रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून स्पर्धेत एकूण ५०,००० रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेत अर्चित सोनगडकर, अनय जोशी, आर्या कुलकर्णी, मनस्वी राऊत, इरा पांडे, आरव बुरांडे, दिपाली राठोड, मनाली देशपांडे हे खेळाडू झुंजणार आहेत.
जिल्हास्तरीय पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १५० हुन अधिक अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे. हि स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण या ठिकाणी होणार आहे. ब्रिजमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हि या स्पर्धा होत असून एकूण ८५,००० रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.
Comments are closed.