T20WC2026: सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत; जाणून घ्या तिकीट बुकिंगची संपूर्ण माहिती

टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार आता ‘सुपर-8’ टप्प्यात पोहोचला आहे. या फेरीतील सामन्यांना 21 फेब्रुवारी (शनिवार) पासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ या टप्प्यातील आपला पहिला सामना 22 फेब्रुवारी (रविवार) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे (India vs South Africa). सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी फेरीतील चारही सामने जिंकल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
सर्वप्रथम Bookmyshow चे ॲप किंवा वेबसाईट ओपन करून ‘स्पोर्ट्स’ (Sports) सेक्शनमध्ये जाऊन ‘अहमदाबाद’ शहर निवडा किंवा थेट ‘भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका’ सामना शोधा. ‘बुक टिकट्स’ (Book Tickets) वर क्लिक करून तुमच्या पसंतीची जागा (सीट) निवडा. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये डिजिटल ‘एम-तिकीट’ (M-Ticket) मिळेल. सामन्याच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता तिकीटाचा क्यूआर कोड (QR Code) जनरेट होईल, जो स्कॅन करून तुम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या हाय-व्होल्टेज सामन्याच्या तिकीटांची सुरुवात 1,000 रुपयांपासून होणार आहे. स्टेडियममधील स्टँड आणि सुविधेनुसार तिकीटाचे दर 25,000 रुपयांपर्यंत असू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार तिकीट निवडू शकता.
Comments are closed.