200 टक्के टॅरिफची धमकी दिल्यानंतरच थांबला हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. मी 200 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी संघर्ष थांबवला, असा दावा ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये आयोजित ‘बोर्ड ऑफ पीस’ या कार्यक्रमात केला. या संघर्षात 11 लढाऊ विमाने पडल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला, मात्र ती कोणत्या देशाची होती हे सांगितले नाही.

ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पुन्हा एकदा ते म्हणाले की, मी दोघांनाही स्पष्ट सांगितले की, त्यांनी संघर्ष थांबवला नाही तर अमेरिका त्यांच्याशी कोणताही व्यापार करार करणर नाही. त्यानंतरच त्यांनी युद्ध थांबण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.