Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर; 16 मार्चला मतदान, शरद पवारांसह ‘या’ खासदारांची मुदत संपणार

भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या  सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा दणका, टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवला, अधिकार वापरताना मर्यादा ओलांडल्याचा ठपका

अमेरिकेच्या  सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ  बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हलं. या निर्णयातील माहितीनुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादले. अमेरिकेच्या संविधानानुसार कर आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून काँग्रेस म्हणजेच संसदेला मिळालेला आहे. मात्र, ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरलं. ट्रम्प यांनी हे निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं  होतं. टॅरिफ शिवाय अमेरिका उद्धवस्त होईल, असं ट्रम्प म्हणाले होते.

Comments are closed.