गुजरातमध्ये ट्रक-कार अपघातात सात ठार

वृत्तसंस्था/ गांधीनगर

गुजरातमधील वलसाड येथे शुक्रवारी दुपारी कार आणि ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच पाच जणांचे प्राण गेल्याचे सांगण्यात आले. या आपघातात दोघेजण जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. कपराडा तालुक्यातील कुंभ घाट येथे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब कपराडा येथील अंबा गावातील होते. ते एका इको-स्टाईल कारमधून लग्नाला जात होते. कुंभ घाटाच्या वळणावर कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जवळच्या गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत 108 रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले. जलदगतीने मदतकार्य राबवूनही अपघातग्रस्तांपैकी एकाचेही प्राण वाचू शकले नाहीत.

Comments are closed.