सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प बिथरले, जगभरातील सर्वच देशांवर 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दणका दिला. राष्ट्राध्यक्षांना असे टॅरिफ लावण्याचा अधिकारच नाही, हे बेकायदेशीर आहे, असे खडे बोल सुनावत न्यायालयाने हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांमध्ये ट्रम्प यांच्या कार्यालयाने नव्या आदेशावर स्वाक्षरी केली असून या आदेशानुसार आता जगातील सर्व देशांमधून आयात होणाऱ्या सामानावर 10 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करून माहिती दिली.
मला हे सांगताना गर्व होतोय की माझ्या ओवल ऑफिसने सर्व देशांवर 10 टक्के जागतिक टॅरिफ लावण्यावर स्वाक्षरी केली असून हा निर्णय तात्काळ लागू होईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याचे स्पष्ट संकेतही दिले होते.
1974 च्या व्यापार कायद्याच्या कलम 122 नुसार 10 टक्के जागतिक टॅरिफ लावण्याचा आदेश देऊ, जे सध्याच्या टॅरिफच्या अतिरिक्त असतील, असे ट्रम्प म्हणाले होते. तसेय मी याहून अधिक शुल्कही लावू शकतो, असा इशाराही त्यांना दिला होता.
🚨 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी सर्व देशांवर 10% जागतिक शुल्क लादले. pic.twitter.com/42ZGDnMxbR
– व्हाईट हाऊस (@व्हाइटहाउस) 20 फेब्रुवारी 2026
Comments are closed.