पाकिस्तानी सरकारने सैनिकांना सोडले वाऱ्यावर, बलुचच्या कैदेतील सात जणांची मदतीची याचना
पाकिस्तानी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने आणखी एक धक्कादायक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी सैनिक सरकारकडे मदतीची याचना मागताना दिसत आहे. या व्हिडीओत एकूण 7 सैनिक दिसत असून ते रडत आहेत. पाकिस्तानसाठी लढूनही सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. आमच्याकडे पाकिस्तानी सैन्याचे ओळखपत्र आहे. तरीही आम्हाला सैनिक म्हटले जात नाही, असे या व्हिडीओत सैनिक म्हणतात दिसत आहे. या व्हिडीओमुळे पाकिस्तानी सैन्यांनी सरकारने वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने 14 फेब्रुवारीला या सैनिकांना पकडले होते. त्यांच्या सुटकेसाठी बीएलएने बलुच लढवय्यांच्या सुटकेची मागणी केली होती. यासाठी पाकिस्तान सरकारला 22 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हा व्हिडीओ बीएलएच्या अधिकृत चॅनेल ‘हक्काल’वर जारी करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये, कैद केलेल्या सैनिकांना बीएलएचे सैनिक म्हणतात, पाकिस्तान सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, पण ते तुम्हाला आपले मानण्यास तयार नाहीत. तुम्ही कसे सिद्ध कराल की तुम्ही पाकिस्तानी सैनिक आहात?, या प्रश्नावर एक सैनिक म्हणतोय की, आमच्याकडे अधिकृत सेवा कार्ड आणि ओळखपत्र आहे, असे सैनिकांनी म्हटले आहे.
सर्वकाही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी
बलुच लिबरेशन आर्मी ही एक संघटना असून जी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. या संघटनेची स्थापना 2000 साली झाली आहे. या संघटनेला अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना पाकिस्तानी सेना, सरकार आणि सीपीईसीसारख्या चिनी प्रकल्पांना लक्ष्य करत आहे. बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात गरीब प्रांत आहे, तर येथे नैसर्गिक संसाधनांची भरपूर उपलब्धता आहे.
Comments are closed.