गोगोईंच्या मुलांना राजकारणात ओढू नका
प्रियांका वड्रा यांच्याकडून मुख्यमंत्री लक्ष्य
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई यांच्यावर मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी टीका केली आहे. गोगोईंचा परिवार आणि त्यांच्या मुलांना यात ओढणे ‘चुकीचे राजकारण’ आहे असे वड्रा म्हणाल्या. प्रियांका यांनी सोनपूर येथील जुबीन खेत्रमध्ये दिवंगत गायक जुबीन गर्गला श्रद्धांजली अर्पण केल्यावर जुबीन यंनी जीवनभर प्रेमाचा संदेश फैलावल्याचे उद्गार काढले आहेत. जुबीन खेत्रमध्येच जुबीन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानी कनेक्शनवरून भाजपकडून गंभीर आरोप केले जात आहेत. याबद्दल प्रियांका वड्रा यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. राजकारणात दोन प्रकारचे नेते असतात, एक सकारात्मक राजकारण करता आणि दुसरे ध्रूवीकरण करतात. तर गौरव गोगोई हे प्रेमाचे राजकारण करत असल्याचा दावा प्रियांका यांनी केला.
गोगोई हे सकारात्मक व्यक्ती असून ते राजकारणात सकारात्मकता आणू इच्छित आहेत. याचमुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे आसामची जनता ओळखून आहे. परतु गौरव गोगोई यांच्या परिवारावर आरोप करणे चुकीचे राजकारण आहे. कुठल्याही नेत्याने परिवार आणि मुलांना राजकारणापोटी लक्ष्य करू नये असे प्रियांका वड्रा यांनी म्हटले आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नोकरीच्या शोधात असलेल्या युवा आणि महिलांविषयी बोलण्याची गरज आहे. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून राज्याच्या जनतेसोबत हा विश्वासघात असल्याचा दावा प्रियांका वड्रा यांनी केला आहे. तर वड्रा यांनी गुरुवारी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी शर्मा सरकारच्या विरोधात
Comments are closed.