लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये चोरी करणारा गजाआड, 21 लाख किमतीच्या सोन्या-चांदीच्या लगडी हस्तगत
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या किमती ऐवज असलेल्या बॅग अचूक हेरून त्या चोरणारा रेल्वे गुन्हे शाखेच्या हाती लागला. त्याच्याकडून 21 लाख रुपये किंमतीची सोन्या-चांदीची लगड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
विनय सोनी (38) असे त्या चोराचे नाव आहे. मूळचा कानपूरचा असलेला विनय रीतसर रेल्वेचे तिकीट काढून एक्स्प्रेसने प्रवास करतो. प्रवासादरम्यान उशाखाली किंवा सीटच्या खाली ठेवलेल्या प्रवाशांच्या बॅगा चोरून पसार होतो. तो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसमध्ये येणार असल्याची खबर मिळताच रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाच्या पथकाने सापळा रचून विनयला पकडले. त्याच्याकडून सहा गुह्यांतील 147 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तसेच 55 ग्रॅम वजनाची चांदीची लगड असा 21 लाख किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
Comments are closed.