दादा भुसेंनी राऊतांविरोधात बदनामीचा दावा ठोकला, पण कोर्टात जाताना दोघेही हसत हसत एकत्र पोहोचले;

संजय राऊत आणि दादा भुसे : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मालेगाव न्यायालयात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. न्यायालयात दोन्ही नेते एकमेकांविरोधात असले तरी कोर्टात येताना मात्र ते हसत-हसत एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Raut and Dada Bhuse: एकाच वेळी न्यायालयात हजेरी

मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. यासाठी संजय राऊत आणि दादा भुसे दोघेही न्यायालयात हजर झाले. विशेष म्हणजे न्यायालयात येताना दोघेही एकाचवेळी पोहोचले आणि आतमध्येही शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले.

Sanjay Raut and Dada Bhuse: आधी गैरहजर राहिल्याने दंड

या प्रकरणातील मागील सुनावणीसाठी संजय राऊत न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र आजच्या सुनावणीसाठी ते स्वतः उपस्थित राहिले.

Sanjay Raut and Dada Bhuse: राऊतांकडून प्रतिज्ञापत्र

या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नसल्याचे राऊत यांनी यापूर्वीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार या खटल्यातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती करणारे प्रतिज्ञापत्रही त्यांच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

Sanjay Raut and Dada Bhuse: नेमका वाद कशावरून?

गिरणा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारावरून हा वाद निर्माण झाला होता. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याचा आरोप केला होता. हा मजकूर बदनामीकारक असल्याचा दावा करत भुसे यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.

Sanjay Raut and Dada Bhuse: राजकीय वर्तुळात चर्चा

न्यायालयात एकमेकांविरोधात खटला सुरू असतानाही दोन्ही नेते हसत-हसत न्यायालयात उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे कोर्टातील कायदेशीर लढाई आणि दुसरीकडे वैयक्तिक पातळीवर मैत्रीपूर्ण वातावरण, असे चित्र मालेगाव न्यायालय परिसरात पाहायला मिळाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: शरद पवारांच्या राज्यसभेसाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांची भूमिका अचानक ‘लवचिक’? आदित्य आणि उद्धव ठाकरेंचाही उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?

Thackeray Brothers: स्वीकृत नगरसेवक पदावरून टाळाटाळ, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये बिनसलं? नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.