टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात लागोपाठ सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम ‘या’ संघाच्या नावावर

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या सुपर-८चे संघ निश्चित झाले आहेत. यामधील शेवटचा साखळी सामना ओमान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात (२० फेब्रुवारी) खेळला गेला आहेत. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने जिंकला. यामुळे ओमानला या टी२० विश्वचषकातून रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले. त्यांनी सर्व साखळी सामने गमावले आणि बरोबर एक निराशाजनक विक्रमही आपल्या नावे केला.

टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने सलग गमावण्याचा विक्रम आता संयुक्तपणे ओमानच्या नावावर झाला आहे. हा विक्रम आधीच बांग्लादेशच्या नावावर आहे.

ओमानने पहिल्यांदा २०१६मध्ये टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले होते, त्यामध्ये तीन साखळी सामन्यातील एक सामना जिंकला होता आणि स्पर्धेबाहेर झाले होते. ओमान आणि यूएईमध्ये झालेल्या २०२१च्या आवृत्तीतही ३ पैकी एक सामना जिंकला होता. ते २०२२च्या स्पर्धेसाठी पात्र ठरले नाही. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळली गेली.

यूएस आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या २०२४च्या आवृत्तीतही ओमान एकही सामना जिंकला नव्हता. चार पराभानंतर ते ग्रुप बी च्या गुणतालिकेत सर्वात खाली राहिले. २०२६च्या आवृत्तीतही त्यांनी ४ सामने गमावले आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना दोन्ही संघांसाठी या स्पर्धेचा औपचारिकताच ठरला, कारण दोन्ही संघ आधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया १०५ धावसंख्येचा पाठलाग करत होती. कर्णधार मिचेल मार्शने ३३ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकार मारत नाबाद ६४ धावा केल्या. तसेच त्याने ट्रेविस हेडसोबत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची (४९ चेंडू) भागीदारी केली. जोश इंग्लिस १२ धावा करत नाबाद राहिला.

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने गमावले, तर त्यांना केवळ ओमान आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळाला.

टी२० विश्वचषकात सर्वाधिक सलग पराभव
१० – बांगलादेश (२००७-२०१२)
10* – ओमान (2021 – 2026)
७ – नामिबिया (२०२४-२०२६)
७ – आयर्लंड (२०२२ – २०२६)
7 – PNG (2021 – 2024)

Comments are closed.