T20 World Cup – पंड्याने शॉट मारला अन् घात झाला; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वी हिंदुस्थानचा धुरंधर दुखापतग्रस्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ICC T20 World Cup 2026 सुपर 8 ची रणधुमाळी आजपासून (21 फेब्रुवारी 2026) सुरू होणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुपर 8 चा पहिला सामना खेळला जाईल. टीम इंडिया आपल्या सुपर 8 च्या मोहिमेला 22 फेब्रुवारी पासून सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेवरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. तत्पूर्वी टीम इंडियाच्या गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली असून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सराव सत्र सुरू असताना हार्दिक पंड्याने जोरदार शॉट मारला आणि हा चेंडू नेमका मोहम्मद सिराजच्या पायाला लागला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो त्याच क्षणी मैदानातून लंगडत लंगडत बाहेर गेला. त्यामुळे दुखापतीतून सावरत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळते का न? हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मोहम्मद सिराजने टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेविरुद्ध झालेला पहिला सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात त्याने धारधार गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर जसप्रीत बुमराहच कमबॅक झालं आणि सिराजला उर्वरित सामने तंबूत बसून पाहावे लागले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखळी फेरीत टीम इंडियाचा शेवटचा सामना नेदरलॅंडविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेलच्या जागी वॉशिंगट सुंदरला संधी मिळाली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.