मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा! फडणवीस याची चौकशी करणार का? अंबादास दानवे यांचा सवाल
राज्यात दररोज नवेनवे घोटाळे उघड होत आहेत. तसेच भाजप सरकारचा भ्रष्टाचारी कारभार जनतेसमोर येत आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनी महाघोटाळा उघड करत ‘पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची चौकशी करणार का? असा सवाल केला आहे.
अंबादास दानवे यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राची महालुट! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींचा ‘महा-घोटाळा’ झाला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क ‘बनावट बँक गॅरंटी’ देऊन कंत्राटं लाटली? महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.) यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे ५ गुन्हे दाखल होणे ही नामुष्की आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्री यांच्या यातील सहभागाची चौकशी ‘पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का? असा सवाल दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्राची महालुट!
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींचा ‘महा-घोटाळा’ झाला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क ‘बनावट बँक गॅरंटी’ देऊन कंत्राटं लाटली?
महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.)…
— अंबादास दानवे (@iambadasdanve) 21 फेब्रुवारी 2026
भाजप सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत असताना अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राची महालूट सुरू असून या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. तसेच मुख्यमंत्री याची चौकशी करणार का? प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार? असे सवाल केले आहेत.
Comments are closed.