क्रिकेटपटू शिखर धवनची नवी इनिंग, मैत्रिण सोफीसोबत चढला बोहल्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू शिखर धवनने त्याच्या आयुष्यात एक नवी इनिंग सुरू केली आहे. ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धवनने शनिवारी एका खाजगी समारंभात त्याची जुनी मैत्रीण सोफी शाइनसोबत लग्न केले. हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने आणि जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडला.

धवन आणि सोफी गेल्या काही वर्षांपासून डेटिंग करत होते. परंतु हे नाते मात्र त्यांनी गेल्या वर्षी काही जवळच्या नातेवाईंसोबत शेअर केले होते.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ते पहिल्यांदा दुबईमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या या नात्याची चर्चा सुरु झाली होती. लग्नापूर्वी धवनने त्याच्या संगीत समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या खास प्रसंगी, धवनचा माजी सहकारी युजवेंद्र चहलनेही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आणि नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

धवन आणि सोफीने या वर्षी जानेवारीमध्ये सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. आता, लग्नानंतर धवनचे चाहते “गब्बर” आणि त्याच्या जोडीदाराच्या फोटोंवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Comments are closed.