Pak vs NZ: सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकणे आता आव्हानात्मक!

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs Newzealand) यांच्यातील महत्त्वाचा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पावसाच्या व्यत्ययामध्ये टॉस झाला आणि पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही आणि अखेर पंचांना हा सामना रद्द करावा लागला.
पावसामुळे सामना रद्द झाल्याने पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने चांगले पुनरागमन केले होते आणि न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा अलीकडील रेकॉर्ड पाहता त्यांना हा सामना जिंकण्याची मोठी संधी होती. मात्र, सामना न झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण वाटून घ्यावा लागला.
आता पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. जर अजून एखादा सामना पावसामुळे रद्द झाला, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. पाकिस्तानचा पुढचा सामना 24 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध, तर 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले येथे होणार आहे.
Comments are closed.