सीआरपीएफचे वाहन कालव्यात पडले

नऊ सीआरपीएफ जवान जखमी, रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये शनिवारी एक मोठा अपघात झाला. सीआरपीएफचे एक मोबाईल बंकर वाहन कालव्यात कोसळल्यामुळे नऊ सैनिक जखमी झाले. ही घटना उमर हेअर सौरा परिसरात नदीकाठाजवळ बंकर ड्युटीवर असताना घडली. वृत्तानुसार, ए/21 बटालियनचा मोबाईल बंकर वाहन नदीकाठाजवळ तैनात होते. अचानक काही कारणास्तव वाहन कालव्यात कोसळले. या अनपेक्षित घटनेमुळे घबराट पसरली. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. नदीत पडलेल्या बंकरमधून सर्व सैनिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्व जखमी सैनिकांना तात्काळ एसएसकेआयएमएस सौरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments are closed.