'नमो भारत' ट्रेन आज सुरू होणार आहे
वृत्तसंस्था / मेरठ (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नमो भारत’ रेल्वेगाडीचा शुभारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे ते मेरठमधील मेट्रोरेल्वेचेही उद्घाटन करणार आहेत. ‘नमो भारत’ रेल्वेगाडीचा प्रारंभ मेरठमधील ‘शताब्दी नगर नमो भारत रेल्वे स्थानका’वरुन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ते पूर्ण झालेल्या अनेक प्रकल्पांचे राष्ट्रार्पणही करणार आहेत. असे 13 प्रकल्प सध्या सज्ज असून त्यांच्यासाठी 930 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. या सर्व कार्यक्रमांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे. ही भारतील प्रथमच ‘नमो भारत’ रेल्वे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 82 किलोमीटर लांबीच्या ‘नमो भारत’ कॉरीडॉरचेही उद्घाटन होणार आहे. शहरी भागातील वाहतूक सुखकर व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अनेक प्रकल्प सध्या विविध महानगरे आणि नगरांमध्ये हाती घेण्यात आले आहेत. त्यांच्यापैकीच हे मेरठमधील महत्वाचे प्रकल्प आहेत, अशी माहिती देण्यात आली.
Comments are closed.