बीडच्या लाचखोर तहसीलदाराच्या घरावर एसीबीची धाड; सोन्याचा मोठा ऐवज सापडला,अंगझडतीत 80 हजारांची र

बीड क्राईम न्यूज: परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी लाच प्रकरणात अटक केली. त्यानंतर पथकाने नांदेड येथील त्याच्या निवासस्थानाची झाडाझडती घेत येथून रोख रकमेसह 13 तोळे सोने (Gold news) जप्त केल्याची माहिती आहे. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नांदेड येथील यशोविहार कॉलनीत घर आहे. परळी येथे त्यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा (Bribe case) दाखल झाला आहे. त्यानंतर परळी येथील घरासह नांदेडच्या घराची झडती घेण्यासाठी पथक दाखल झाले होते. जप्त सोन्यात एक तोळ्याची मिनी गंठण, सहा तोळ्यांच्या पाटल्या, पाच तोळ्याचे कडे आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र, 55 हजार रोख यांचा समावेश आहे. यापूर्वी परळी येथील निवासस्थानी तपासणी केली असता काही आढळले नव्हते. मात्र, त्यांच्या अंगझडतीत 80 हजार रुपये सापडले होते. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात लोकसेवक कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. आता त्यांच्याविरोधात पुढील कारवाई केली जाईल. (Beed news)

एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे.

Beed News: नेमकं प्रकरण काय?

तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपयांमध्ये सौदा ठरला होता. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने तहसीलदरा व्यंकटेश मुंडे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

Satara news: साताऱ्यातील मुंढे गावातून चार बांगलादेशींना घेतले ताब्यात

साताऱ्यातील कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना मुंढे गावातून पोलिसांनी अटक केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  मु़ंढे गावातील सह्याद्री रेसिडेन्सीमधून या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हे बांगलादेशी नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना वास्तव्य करत होते. बिलाल सलालउद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मूळचे बांगलादेशातील विष्णुपूर (जि. कालिया, नोडाईल) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

गळफास घेताना साडी फाटल्याने थोडक्यात बचावले, शिंदेंच्या बीड तालुका उपप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न

आणखी वाचा

Comments are closed.