लालबागचा राजा मंडळाचे एआय डिजिटल ग्रंथालय, मंगळवारी उद्घाटन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजा एआय डिजिटल लायब्ररी या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता लालबाग राजा प्रबोधिनी, म्युनिसिपल शाळा, लालबाग येथे हा सोहळा होणार आहे.

एआयचे महत्त्व लक्षात घेता लालबागचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या वतीने लालबागचा राजा एआय अंकीय ग्रंथालय विनामूल्य सुरू करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवसेना नेते–खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका भारती पेडणेकर, नगरसेवक किरण तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी दिली.

Comments are closed.