T20 WC26: सुपर-8च्या दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट! इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामना रद्द झाल्यास सेमीफायनल…

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८चे सामने सुरू आहेत. यामधील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जाणार होता, मात्र पावसामुळे हा २१ फेब्रुवारीचा सामना रद्द झाला. आज (२२ फेब्रुवारी) या फेरीचे दोन सामने खेळले जाणार आहेत. हा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा असून तो पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावेळीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकत उपांत्य फेरीत जागा पक्की करण्याचा इरादा असणार आहे. वातावरणाला मात्र वेगळेच पाहिजे आहे. या सामन्यावेळी ५० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामनाही रद्द झाला तर उपांत्य फेरीत जाण्याच्या शर्यतीत चांगलीच चढाओढ दिसणार आहे.
आयसीसीच्या या स्पर्धेच्या सुपर-८च्या नियमानुसार उपांत्य सामने आणि अंतिम सामन्यासाठी रिजर्व-डे नाही. सामन्याच्या निकालासाठी कमीत कमी पाच षटके खेळण्याची आवश्यकता आहे. कट-ऑफ टाईमपर्यंत काही झालेच नाहीतर सामना रद्द होईल. यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुण वाटून दिला जाईल.
आधीच ग्रुप-२ मधील पाकिस्तान आणि न्यझीलंडचे एक-एक गुण झाले आहेत. अशातच इंग्लंड आणि श्रीलंकेचेही एक-एक गुण झाले तर या ग्रुपमधील चारही संघांचे एका सामन्यानंतर प्रत्येकी एक गुण होईल. त्यामुळे त्याच्यांकडे केवळ दोन सामने खेळायचे बाकी राहतील. यामधील एक सामना जरी गमावला तरी संघ बाहेर जाईल.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका-
दोन्ही संघांमधील समोरासमोर टी २० सामन्यांची कामगिरी पाहिली तर त्यांच्यात आतापर्यंत १७ सामने खेळले गेले. ज्यामध्ये इंग्लंड १३-४ असा आघाडीवर आहे. ज्यामध्ये २०१६ पासून खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांपैकी प्रत्येक विजयांचा समावेश आहे. त्यापैकी तीन सामने याच ठिकाणी झाले होते. इंग्लंडने टी२० विश्वचषकात (२०१० च्या उपांत्य फेरीसह) ५-१ अशी आघाडी घेतली आहे, तर श्रीलंकेचा एकमेव विजय २०१२ मध्ये याच ठिकाणी झाला होता.
Comments are closed.