अश्विनी बिद्रेचे मृत्यू प्रमाणपत्र; पोलिसांसह सर्वांनीच केले हात वर, पतीने फोडला इच्छामरणासाठी टाहो
अश्विनी बिद्रे यांच्या हत्याप्रकरणी मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावून वर्ष उलटत आले असले तरी त्यांच्या कुटुंबीयांना अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखल मिळाला नाही. हा दाखला देण्यासाठी पोलिसांसह सर्व प्राधिकरणांनी हात वर केले आहेत. परिणामी पोलीस दलाकडून मिळणारे कोणतेही लाभ कुटुंबाला मिळालेले नाहीत. प्रशासनाकडून होत असलेल्य या छळवणुकीला कंटाळून अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी आत इच्छामरण द्या असा टाहो फोडला आहे.
कुरुंदकरला २१ एप्रिल २०२५ रोजी जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयाला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण् आवश्यक होते. मात्र सरकारने अपील केले नाही. अश्विनी यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असताना त्यांचा मृत्यू दाखला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा दाखला मिळत नसल्यामुळे पोलीस दलाकडून मिळणारे कोणतेही लाभ अद्याप कुटुंबाला मिळालेले नाहीत. त्यामुळे मल इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अश्विनी यांचे पती राज गोरे यांनी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांच्याकडे केली आहे.
पनवेल सत्र न्यायालयाने अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल देताना नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यामध्ये पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांचाही समावेश होता. न्यायालयाने हे निर्देश देऊन नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही.
Comments are closed.