देश विदेश बातम्या – हिंदुस्थानी वंशाच्या आशा शर्मा मायक्रोसॉफ्टमध्ये सीईओपदी
हिंदुस्थानी वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदावर फिल स्पेन्सर असून ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आशा शर्मा यांची नियुक्ती कंपनीने केली आहे. आशा शर्मा या थेट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना रिपोर्ट करतील. आशा शर्मा यांनी याआधी प्रसिद्ध डिलिव्हरी फर्म ‘इन्स्टाकार्ट’मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि ‘मेटा’मध्ये प्रोडक्ट लीडरशिप यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
खिशाला फटका, सिगारेट ओढणाऱ्यांना धक्का
सिगारेट ओढणाऱ्यांना आता सिगारेटसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून तंबाखू उत्पादनावर लागू केलेल्या नव्या टॅक्स सिस्टिमनंतर आता गोल्ड फ्लेक आणि क्लासिक या सिगारेट ब्रँड्सने किंमती वाढवल्या आहेत. केंद्र सरकारने 28 टक्के जीएसटी ऐवजी 40 टक्के जीएसटी आणि अतिरिक्त एक्साईज डय़ुटी लावली आहे. यामुळे सिगारेट कंपन्यांनी सिगारेट महाग केले आहे. क्लासिकचे 340 रुपयांना मिळणारे सिगारेट आता 480 रुपये, गोल्ड फ्लेकचे 170 चे सिगारेट 240 रुपयांना झाले आहे.
नासाकडून आर्टेनिस-2 चंद्र लाँचचा यशस्वी सराव
अमेरिकेची सरकारी अंतराळ संस्था ‘नासा’ ने आर्टेनिस-2 लुनारच्या यशस्वी लाँचिंगसाठी सराव करायला सुरुवात केली आहे. नासाने या मिशनसाठी यशस्वी सराव केला आहे. या प्रक्रियेला वेट ड्रेस रिहर्सल असे नाव देण्यात आले. हे फ्लोरिडा येथील केप पॅनव्हरल येथे करण्यात आले. या सरावामध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया, उलटी गणना आणि प्रक्षेपण रद्द होण्याच्या परिस्थितींची तपासणी करण्यात आली. परंतु, उड्डाण मात्र करण्यात आले नाही. या सरावात वास्तविक परिस्थितीनुसार पूर्ण रॉकेट टाक्या आणि तांत्रिक तपासणीसह पूर्ण करण्यात आले.
धक्कादायक! 16 एक हजार वाहनांचा इंजिन आणि चेसिस क्रमांक एकच
देशातील 8 राज्यांमध्ये 16 हजार वाहनांची नोंदणी संशयास्पद आढळली आहे. या वाहनांचे इंजिन आणि चेसिस क्रमांक समान आहेत. याबाबत ‘कॅग’च्या ताज्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. हा अहवाल आसाम विधानसभेत मांडण्यात आल्यानंतर परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. पेंद्र सरकारच्या ‘वाहन’ डेटाबेसच्या तपासणीत एपूण 15,849 वाहनांच्या नोंदणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एकट्या आसाममध्ये 12,116 वाहने कोणत्याही ना हरकत प्रमाणपत्राशिवाय नोंदणीपृत असल्याचे आढळले आहे.
Comments are closed.