Ethnic Short Kurti : उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय? शॉर्ट कुर्त्यांच्या या ट्रेंडी डिझाइन्स करा ट्राय

उन्हाळा सुरू झाला की कपाटात हलक्या, आरामदायक कपड्यांची गरज भासते. अशा वेळी महिलांसाठी शॉर्ट कुर्ती हा सर्वात ट्रेंडी आणि सोयीस्कर पर्याय ठरतो. पारंपरिक आकर्षण आणि आधुनिक डिझाइन यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शॉर्ट कुर्ती. ऑफिस, कॉलेज, कॅज्युअल आउटिंग किंवा छोट्या गेट-टुगेदरसाठी हा लूक अगदी परफेक्ट बसतो.
(महिलांच्या उन्हाळ्यातील फॅशन ट्रेंडसाठी नवीनतम शॉर्ट कुर्ती डिझाइन)

शॉर्ट कुर्तीची खासियत म्हणजे तिची बहुपयोगी स्टाईल. ती जीन्स, पँट, पलाझो, पटियाला सलवार किंवा धोती पँटसोबत सहज मॅच होते. त्यामुळे इंडो-वेस्टर्न लूक मिळतो, जो दिसायला आकर्षक आणि घालायला आरामदायक असतो.

लखनवी चिकनकारी शॉर्ट कुर्ती

लखनवी चिकनकारी शॉर्ट कुर्ती: ही डिझाइन आजही महिलांची पहिली पसंती आहे. बेबी पिंक, स्काय ब्लू, मिंट ग्रीन अशा पेस्टल रंगांमध्ये ही कुर्ती अधिक खुलून दिसते. साध्या पांढऱ्या जीन्ससोबत ती एकदम एलिगंट लूक देते.

पेप्लम लाँगलाइन टॉप
पेप्लम स्टाइल शॉर्ट कुर्ती

पेप्लम स्टाइल शॉर्ट कुर्ती: सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. कंबरेपासून हलका घेर असलेली ही डिझाइन जीन्ससोबत खूप स्टायलिश दिसते.

  अंगरखा स्टाईल अंगरखा
अंगरखा पॅटर्न

अंगरखा पॅटर्न : ही कुर्ती पारंपरिक लूकसाठी उत्तम पर्याय आहे. साईडला असलेल्या दोऱ्या आणि लटकन यामुळे लूक अधिक उठावदार दिसतो.

फ्लोरल प्रिंटेड ए-लाइन कुर्ती
ए-लाइन प्रिंटेड कुर्ती

ए-लाइन मुद्रित कुर्ती: रोजच्या वापरासाठी आरामदायक मानली जाते. फ्लोरल किंवा जयपुरी प्रिंटमध्ये ती अधिक आकर्षक दिसते.

बेल स्लीव्ह शॉर्ट कुर्ती
बेल बाही कुर्ती

 

बेल स्लीव्हज कुर्ती: ही कुर्ती साध्या डिझाइनलाही मॉडर्न टच देते. तर सैल कपडे आवडणाऱ्यांसाठी ही स्टाईल शॉर्ट कुर्ती उत्तम पर्याय आहे.

या सगळ्या स्टाईलसोबत योग्य फॅब्रिकची निवडही तितकीच महत्त्वाची आहे. कॉटन, लिनन किंवा रेयॉनसारखे कापड उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतात. यासोबत ऑक्सिडाईज्ड दागिने, स्टाईलनुसार लहान- मोठे झुमके किंवा नाजूक गळ्यात छोकरी घातल्यास एथनिक लूक अधिक खुलतो. कोल्हापुरी चप्पल किंवा मोजरी लूकला पूर्णता देते.

शॉर्ट कुर्ती ही केवळ फॅशन नाही, तर आराम आणि स्टाईलचा परफेक्ट समतोल आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या वॉर्डरोबमध्ये काही ट्रेंडी शॉर्ट कुर्त्या नक्की सामील करा.

Comments are closed.