दुबई पोलिसांच्या ताफ्यात नऊ कोटींची कार
दुबई पोलिसांच्या ताफ्यात आता लँम्बोर्गिनी रिवेल्टो या आलिशान कारचा समावेश करण्यात आला आहे. मार्केटमध्ये या कारची किंमत तब्बल साडे आठ कोटी ते नऊ कोटी रुपयांपर्यंत आहे. ही सुपरकार अवघ्या 2.5 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रति तास वेग पकडते. या कारची कमाल मर्यादा 350 किमी इतकी आहे. जी काही बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त आहे. या कारला दुबई पोलिसांच्या सिग्नेचर पांढऱ्या आणि गडद हिरव्या रंगात रंगवण्यात आले आहे. कारवर मैन्सरीचा बॅज आणि नवीन कार्बन स्प्लिटर, साईड स्कर्ट्स आणि विशेष फिन्स लावण्यात आले आहेत. लॅम्बोर्गिनी रेवुएल्टोच्या समावेशामुळे दुबई पोलिसांचा ताफा अधिक पॉवरफुल झाला आहे.
Comments are closed.