अजितदादांचा अपघात नव्हे 100 टक्के घातपातच, सखोल तपासाच्या मागणीसाठी लोणी भापकरमध्ये कडकडीत बंद

अजित पवार विमान अपघात: दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या विमानाही अपघाताबाबत (Ajit Pawar accident plane crash) दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अपघात की घातपात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गाव आज बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी ग्रामस्थांनी ‘अमर रहे, अमर रहे अजितदादा अमर रहे’ अशा घोषणाही दिल्या. (Maharashtra Politics news)

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात केल्याचा संशय आहे. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव आज बंद ठेवण्यात आले आहे.यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे. अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. तसेच आमच्या गावातील सर्व संघटना व ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सामील होणार आहेत, असे  पत्र लोणीभापकर ग्रामपंचायतीने पोलिसांना दिले आहे.

रोहित पवारांवर तेलुगू देसम पक्ष: रोहित पवारांचे दोष तेलुगु देसम पक्षाने फेटाळले

दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी अलीकडेच दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर मांडणी केली होती. यावेळी त्यांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि पायलट सुमित कपूर यांच्याबाबत संशय व्यक्त केला होता. सोबतच यावेळी रोहित पवारांni तेलुगु देसम पक्ष पक्षवर काही दोष केले होते. हे दोष आता तेलगू देशम पक्षाकडून फेटाळून लावण्यात आले आहेत. रोहित पवारांच्या आरोपांना ऑन रेकॉर्ड उत्तर देण्यास मात्र तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांचा नकार असल्याची माहिती आहे.

Telugu Desam Party : बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, चौकशी यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे

अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित कोणालाही वाचवण्यासाठी मंत्री राममोहन किंवा टीडीपीचा सहभाग असल्याच्या आरोपांना कोणताही आधार नाही. हे आरोप पूर्णपणे निराधार, बिनबुडाचे आहेत. राजकीय हेतूने केलेले वाटतात. विमान अपघातांची चौकशी ही स्थापित आंतरराष्ट्रीय AAIB प्रोटोकॉल्स आणि ICAO नियमांनुसार काटेकोरपणे केली जाते. या चौकशा तांत्रिक, पारदर्शक आणि पूर्णपणे पुराव्यांवर आधारित असतात. बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, चौकशी यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे आणि पुराव्यांवर आधारित निष्कर्ष येऊ द्यावेत. एका आदरणीय राजकीय नेत्याच्या दुर्दैवी निधनाचे संकुचित राजकीय फायद्यासाठी राजकारण केले जात असल्याचे अत्यंत खेदजनक आहे. टीडीपीने अजित पवार यांना नेहमीच उच्च मान दिला आहे आणि सत्य समोर यावे तसेच जबाबदार असलेल्यांवर, असल्यास, कारवाई व्हावी यासाठी पक्ष पूर्णपणे कटिबद्ध आहे. असं तेलुगु देसम पक्षाकडून सांगण्यात आलंय.

आणखी वाचा

पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.