अभिषेक शर्मा IN, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात मोठा खेळाडू OUT, अशी असणार टीम इंडियाची Playin
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर-8 सामना: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत आज (22 फेब्रुवारी) भारताची भिडंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. संपूर्ण स्पर्धेत अद्याप अपराजित असलेल्या भारतीय संघात या सामन्यासाठी एक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अभिषेक शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर नाही….
टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मासाठी हा टी-20 विश्वचषक आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. सलग तीन सामन्यांत त्याच्या खात्यात ‘डक’ची नोंद झाली आहे. तरीही त्याला संघाबाहेर करण्यात येणार नाही, असे स्पष्ट संकेत कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सामन्यापूर्वी दिले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा ईशान किशनसोबत डावाची सुरुवात करताना दिसेल. क्रमांक तीनवर तिलक वर्मा फलंदाजीस येण्याची शक्यता असून, या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा असेल.
𝐀𝐡𝐦𝐞𝐝𝐚𝐛𝐚𝐝 𝐚𝐰𝐚𝐢𝐭𝐬 𝐚 𝐭𝐡𝐫𝐢𝐥𝐥𝐧𝐧 𝐒𝐮𝐩𝐞𝐫 𝟖 𝐜𝐥𝐚𝐬𝐡 ⏳#TeamIndia सर्व तयार आहे आणि तयार आहे #INDvSA 👊#T20WorldCup | #मेनइनब्लू pic.twitter.com/ITVpUg9e9k
— BCCI (@BCCI) 21 फेब्रुवारी 2026
कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः क्रमांक चारवर फलंदाजीची धुरा सांभाळतील. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाला संतुलन देतील, तर रिंकू सिंगकडून शेवटच्या षटकांत धडाकेबाज फटकेबाजीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग वेगवान माऱ्याची जबाबदारी उचलतील. फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती याच्यासोबत अक्षर पटेलची जोडी दिसण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेल?
गोलंदाजी विभागात एक बदल जवळपास निश्चित मानला जात आहे. अक्षर पटेलला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र अहमदाबादच्या खेळपट्टीवरील त्याचा प्रभावी विक्रम आणि घरच्या मैदानाचा अनुभव लक्षात घेता, त्याला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11 (Team India Playing XI vs South Africa) : अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधर), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.