दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी अभिषेकने केले हेड कोच गंभीरसह ‘सिक्रेट सेशन’, स्थानिक गोलंदाजांची मदत

सामन्याच्या काही वेळाआधी खेळाडू त्यांचे मानसिकरित्या तयार राहण्याच्या प्रयत्नात असतात. याला मात्र भारताचे मुख्य प्रशिक्षक गोतम गंभीर आणि अभिषेक शर्मा अपवाद आहेत. दोघेही नाश्त्यानंतर एका काळ्या रंगाच्या गाडीत बसून कुठेतरी बाहेर गेले. भारताचा सामना आज (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. सुपर-८च्या सामन्याचे महत्व सर्वाना माहित असून अशा स्थितीत हे दोघे कुठे गेले यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

अभिषेक सध्या त्याच्या कारकिर्दीच्या अंत्यत खराब कामगिरीतून जात आहे. तो या स्पर्धेत लागोपाठ तीन वेळा शून्यावर बाद झाला. आक्रमक सलामीवीर असल्याने त्याच्यासाठी अशी कामगिरी ही मानसिकरित्या कठीणच आहे.
गंभीर आणि अभिषेक यांनी स्टेडियममध्ये इनडोअर सेशन केले. यामध्ये त्यांना स्थानिक गोलंदाजांनी मदत केली.

हे सेशन तीन प्रकारमध्ये केले गेले. १५-१५ मिनिटांच्या त्या सेशनमध्ये अभिषेकने रिब-लाइन गोलंदाजी आणि राउंड-द-विकेट स्पिनचा सामना केला. ही गोलंदाजी सामन्याशी मिळती-जुळती आहे. हे सेशन नक्कीच अभिषेकचा आत्मविश्वास मजबूत करण्याच्या कामी येईल. तो त्याच्या आक्रमक सुरूवात करून देण्याच्या लयीत परतेल आणि संघासाटी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.

गंभीरही २०१४ आयपीएल दरम्यान कारकिर्दीत अशाच प्रकारे निराशाजनक कामगिरीतून जात होता. त्याने म्हटले, “जेव्हा मी लागोपाठ तीन वेळा शून्यावर बाद झालो, तेव्हा माझ्यावर खूप दबाव आला होता. त्यामुळे मला माझ्या खेळण्याच्या क्षमतेवरही विश्वास वाटत नव्हता. २००७ आणि २०११च्या अंतिम सामन्यांमध्ये मात्र मला दबाव आला नाही कारण तेव्हा मी धावा केल्या होत्या. २०१४मध्ये मात्र वेगळी स्थिती होती आणि लोक त्याबद्दल चर्चाही करत होते.”

अभिषेकला त्याच्या टी२० विश्वचषकातील पहिल्या धावाची प्रतिक्षा आहे. त्याने या स्पर्धेचा पहिला सामना यूएसएविरुद्ध खेळला होता, त्यामध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सविरुद्धही तो शून्यावर बाद झाला. अशात तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार हे जवळपास निश्चित आहे.

Comments are closed.